चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखा पोलीसची मोठी कार्रवाई
ड्रग्य माफिया कडुन 160 gm MD (मेफोड्रॉन) ड्रग्स पावडरसह एकुण 16,12,500/- रू चा मुद्देमाल जप्त
चंद्रपुर : दि,२७/१०/२०२५ रोजी उपविभाग, चंद्रपुर पथक, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे पोलीस पथक सोबत तसेच पोलीस अधिक्षक,चंद्रपुर यांचे आदेशाने चंद्रपुर जिल्हयात प्रोव्हीशन, जुगार रेड, तसेच अंमली पदार्थ विक्री करणा-यावर कारवाई करुन परत पेट्रोलींग करीत असतांना एका मुखबिर व्दारे माहीती मिळाली कि दिपक कृष्णा वर्मा,(२८ ) धंदा-चालक, रा. संजयनगर, मुन्ना गॅरेज जवळ, मुल रोड, चंद्रपुर तसेच आरोपी आशिष प्रकाश वाळके,(-३० )धंदा-मजुरी, आंबेडकर कॉलेज जवळ, मित्रनगर, चंद्रपुर हे पांढ-या रंगाचे डिजायर कार क्रं. एम.एच.-४९ एएस-२७०४ ने फॉरेस्ट अकादमी, मुल रोड, चंद्रपुर येथे येत आहे. दिलेल्या माहीती वरून मुल रोड, फॉरेस्ट अकादमी समोर पोलीसनी नाकाबंदी करून असतांना पांढ-या रंगाचे डिजायर कार कं. एम.एच. -४९ एएस-२७०४ येत असतांना दिसुन आली. सदर वाहनास थांबवुन वाहन तपासनी केली असता दिपक कृष्णा वर्मा,(२८) धंदा-चालक, रा. संजयनगर, मुन्ना गॅरेज जवळ, मुल रोड, चंद्रपुर यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन 160 gm MD (मेफोड़ॉन) इग्स पावडर सह पांढ-या रंगाचे डिजायर कार क्रं. एम. एच.-४९ एएस-२७०४ असा एकुण 16,12,500/- रू माल जप्त करण्यात आला. आरोपीस विरुध्द पोलीस स्टेशन, रामनगर येथे एन.डी. पी. एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद केला. गुन्हयाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर हे करीत आहेत.
सदर कार्यवाही. पोलीस अधिक्षक. मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात सपोनि दिपक कांक्रेडवार, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनिल गौरकार, पोहवा/सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/दिपक डोंगरे, पोहवा /इम्रान खान, पोअ/किशोर वाकाटे, पोशि/शशांक बदामवार, पोशि/हिरालाल गुप्ता, पोशि/अजित शेंडे, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांनी केली आहे.