Home Breaking News वणी तालुक्यातील बोगस डॉक्टरवर कार्यवाही करावि

वणी तालुक्यातील बोगस डॉक्टरवर कार्यवाही करावि

119

 

वणी तालुक्यातील बोगस डॉक्टरवर कार्यवाही करावि



वैद्यकीय अधिक्षक व तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन


वणी तालुक्यातील, वेळाबाई, बोरगांव, साखरा (को.) कायर, कळमना (बु.) येनाडी, या गावात कोणत्याही वैद्यकीय पदवी नसतांना बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे.
त्यांनी भोळया-भाबड्या व गरीब, अडाणी जनतेची आर्थिक लुट करण्या सोबतच त्यांच्या जिविताशी सुध्दा खेळ चालविला आहे. जास्त भावाने स्वतः जवळच्या गोळया – औषध व सलाईन देऊनजनतेची फसवणुक करुन गब्बर बनले आहे.
बोगस डॉक्टरचा सुळसुळाट झाला असता आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होतांना दिसुन येत आहे. सध्या सर्दी, ताप, खोकला हे आजार मोठया प्रमाणात वाढल्याने हे बोगस डॉक्टर सक्रिय झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभाग हया बोगस डॉक्टरांचे ऑपरेशन कधी करणार असा प्रश्न जनता उपस्थित करीत आहेत. नागरीकांच्या अज्ञानाचा फायदा घेत बोगस डॉक्टरांनी अनेक गावांमध्ये दवाखाने थाटले आहेत.
हयांच्या औषधी मुळे रुग्णांची प्रकृती बिघडल्यानंतर हे डॉक्टर आपले हात वर करुन मोठ्या शहरात घेऊन जाण्याचा सल्ला देत असतात असे बोलल्या जाते व तो पर्यंत रुग्णांचा आजार वाढल्या जात असतो. त्यामुळे रुग्णांच्या जिवितास सुध्दा धोका होऊ शकतो. करीता हया बोगस डॉक्टरवर योग्य ती कार्यवाही करुन हयांचा ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा.अशी मांगणी धनराज सुर्याभान मालमे प्रहार तालुका वाहतुक आघाडी प्रमुख वणी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, यवतमाळ
व पोलीस निरीक्षक साहेब, पो.स्टे. शिरपूर ला निवेदन देऊन मांगणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here