Home Breaking News वढा रेतीघाटावर महसूल विभागांनी तात्काळ लक्ष द्यावे – वाळू माफियांचे डोके वर!

वढा रेतीघाटावर महसूल विभागांनी तात्काळ लक्ष द्यावे – वाळू माफियांचे डोके वर!

74

वढा रेतीघाटावर महसूल विभागांनी तात्काळ लक्ष द्यावे – वाळू माफियांचे डोके वर!


 राञी 8 वाजेपासुन पहाटे 4  वाजेपर्यत सर्रासपणे वाळु तश्तरी



घुग्घुस-: येथील पांढरकवडा-वढा तिर्थ क्षेत्रात अवैधरित्या वाळू उपसण्याचे प्रकार सुरूच आहेत. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घुग्घुस येथील तीन ट्रॅक्टर तसेच वढा गावातील तीन ट्रॅक्टर अशा एकूण सहा ते सात ट्रॅक्टरद्वारे दररोज रात्री आठ वाजेपासून ते पहाटेपर्यंत वाळूची वाहतूक सर्रासपणे सुरू असते.

या अवैध वाळू उपसामुळे शासनाच्या महसूल विभागाला लाखो रुपयांचे नुकसान होत असून, शेतकरी बांधवांच्या शेतीकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून चिखलामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, घुग्घुस पोलीस निरीक्षक मुंग गिळून गप्प तर नाही ना? कारण या वाळू माफियांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने तात्काळ लक्ष घालून अवैध वाळू उपसा थांबवावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here