Home Breaking News गडचांदूरच्या नवनिर्वाचित नगर सेवकांतर्फे विवेक बोढे यांचा सत्कार

गडचांदूरच्या नवनिर्वाचित नगर सेवकांतर्फे विवेक बोढे यांचा सत्कार

52

गडचांदूरच्या नवनिर्वाचित नगर सेवकांतर्फे विवेक बोढे यांचा सत्कार

घुग्घुस: येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात सोमवार, २२ डिसेंबर रोजी गडचांदूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगर सेवकांतर्फे निवडणूक प्रभारी विवेक बोढे यांचा सत्कार करण्यात आला.

नवनिर्वाचित नगर सेवकांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी गडचांदूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगर सेवकांनी निवडणूक प्रभारी विवेक बोढे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

यावेळी नवनिर्वाचित नगर सेवक सतीश बेतावार, सुरज पांडे, हिमांशू नामवाड, सुरेश मेश्राम, सपना सेलोकर, शीतल धोटे, संगीता गाऊत्रे, किर्ती वैरागडे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, नीरज सेलोकर, गोलू इखारे, आशिष ढुमणे, सचिन माली, अमोल थेरे, बबलू सातपुते, गणेश कुटेमाटे, विनय बोढे, उमेश दडमल, बंटी आगदारी, सुनंदा लिहीतकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here