Home Breaking News श्री. जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या कृपेने घुग्घुस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

श्री. जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या कृपेने घुग्घुस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

53

श्री. जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या कृपेने घुग्घुस येथे रक्तदान शिबिराचे आयोजन



देवानंद ठाकरे
घुग्घुस- : येथील शहरात श्री जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज यांच्या कृपेने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सरकारी दवाखाना, घुग्घुस येथे आयोजित करण्यात येणार आहे,येत्या दहा जानेवारी रोजी असून सकाळी ठराविक वेळेत रक्तदान प्रक्रिया पार पडणार आहे.

रक्ताची वाढती गरज लक्षात घेता समाजातील प्रत्येक सक्षम नागरिकाने पुढे येऊन रक्तदान करणे अत्यंत गरजेचे आहे. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात. रक्तदान हे श्रेष्ठ दान असून यामुळे कोणतीही शारीरिक हानी होत नाही, उलट आरोग्यदृष्ट्या फायदेशीर ठरते.

तरी या रक्तदान शिबिराचा लाभ घेत घुग्घुस व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून या उपक्रमास यशस्वी करावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here