Home Breaking News नागभीड पोलीस स्टेशन येथे पोलीस स्थापना दिवस व रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त रक्तदान...

नागभीड पोलीस स्टेशन येथे पोलीस स्थापना दिवस व रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर व रांगोळी स्पर्धेचे आयोज

25

नागभीड पोलीस स्टेशन येथे पोलीस स्थापना दिवस व रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त रक्तदान शिबिर व रांगोळी स्पर्धेचे आयोज

नागभीड :
पोलीस स्थापना दिवस व रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आज दिनांक 09 जानेवारी 2026 रोजी पोलीस स्टेशन नागभीड येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सामाजिक उपक्रमात पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच पोलीस पाटील यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या रक्तदान शिबिरात एकूण 44 रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. रक्तदानामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
याच निमित्ताने पोलीस स्टेशन नागभीड येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत जनता कन्या विद्यालय, नागभीड येथील 23 विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेतला. रस्ता सुरक्षा, सामाजिक संदेश आणि जनजागृती या विषयांवर आधारित रांगोळ्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशस्तिपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये कला, सामाजिक भान व आत्मविश्वास वाढीस मदत झाली.
पोलीस स्टेशन नागभीडच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले असून, भविष्यातही अशा सामाजिक व जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here