Home Breaking News रेकॉर्ड वरील आरोपीतांकडुन सोन्याचे दागीने जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

रेकॉर्ड वरील आरोपीतांकडुन सोन्याचे दागीने जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

28

रेकॉर्ड वरील आरोपीतांकडुन सोन्याचे दागीने जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही



दिनांक ०८/०१/२०२६ रोजी मा. पोलीस अधिक्षक साहेब, चंद्रपुर यांचे आदेशान्वये चंद्रपुर शहरात प्रोव्हीशन, जुगार रेड, मोटार सायकल चोरी व घरफोडी गुन्हयातील आरोपीतांना चेक करणे कामी सरकारी वाहनाने खाना चंद्रपुर शहर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरव्दारे खबर मिळाली की, १) तनविर कदीर बेग, वय-२३ वर्ष, रा. भंगाराम वार्ड, चंद्रपुर, ता. जि. चंद्रपुर, २) सुजल दिलीप ताकसांडे, वय-२३ वर्ष, धंदा-मजुरी, रा. डॉ. जाकीर हुसेन वार्ड, बल्लारशाह, जि. चंद्रपुर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन अंदाजे किमंत ९,७५,०००/- रू. चे सोन्याचे दागीने जप्त करून पोलीस स्टेशन, चंद्रपुर शहर परिसरातील भिवापुर वार्ड, चंद्रपुर येथील गुन्हा उघडकीस आणला आहे. नमुद आरोपीतांना पुढील तपासकामी पोस्टे चंद्रपुर शहर यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन साहेब चंद्रपुर, मा. अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, यांचे नेतृत्वात पोउपनि. विनोद भुरले, पोउपिन सुनिल गौरकार, पोलीस स्टॉफ पोहवा /सुभाष गोहोकार, पोहवा/सतिश अवथरे, पोहवा/रजनिकांत पुठ्ठावार, पोहवा/दिपक डोंगरे, पोहवा/इम्रान खान, पोअं/हिरालाल गुप्ता, पोअं/किशोर वाकाटे, पोअं/शशांक बदामवार, सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here