Home Breaking News वेकोलीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सि. एस. आर अंतर्गत क्रीडा शिबिराचे आयोजन...

वेकोलीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सि. एस. आर अंतर्गत क्रीडा शिबिराचे आयोजन करावे – राजुरेड्डी

29

वेकोलीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर सि. एस. आर अंतर्गत क्रीडा शिबिराचे आयोजन करावे – राजुरेड्डी



घुग्घूस :- शहर हा प्रचंड प्रदूषित शहर असून नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न इथे निर्माण झालेला आहे.
नवीन पिढीला मोबाईल मधून निघून मैदानी खेळात रुची निर्माण व्हावी शारीरिक दृष्ट्या ते सक्षम व्हावे या करीता शालेय विद्यार्थ्यांना या उन्हाळ्याच्या सुट्टीत मैदानी खेळ खेळण्याची संधी उपलब्ध व्हावे याकरिता काँग्रेस शहर अध्यक्ष तथा घुग्घूस नगरपरिषदेचे शहर उपाध्यक्ष राजुरेड्डी यांनी वेकोलीच्या मुख्य महाप्रबंधकांना निवेदनातून शहरातील वेकोलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे सि. एस. आर. निधीतून जवळपास 400 ते 500 विद्यार्थ्यांचे क्रीडा शिबिराचे आयोजन करण्याची विनंती केली असून या शिबिरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स साहित्य, स्पोर्ट्स शू, टी – शर्ट – पॅन्टस व खाण्या पिण्यासाठी पौष्टिक पदार्थ शीतपेयचा वितरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
दरवर्षी या क्रीडागणावर विविध क्रीडा शिबिराचे आयोजन उत्कृष्टपणे करण्यात येत असते
यावर्षी शहरातील सर्वच स्तरातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेता येईल अशी व्यवस्था करावी अशी विनंती करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here