Home Breaking News गुढीपाडव्याला दुचाकी रॅलीने घुग्घुस शहर दुमदुमले

गुढीपाडव्याला दुचाकी रॅलीने घुग्घुस शहर दुमदुमले

13

गुढीपाडव्याला दुचाकी रॅलीने घुग्घुस शहर दुमदुमले



महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने रॅली लक्षवेधी


घुग्घुस: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर शहरातील प्रयास सखी मंचतर्फे महिलांची भव्य दुचाकी रॅली आयोजन करण्यात आले. शहरातील महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने ही रॅली लक्षवेधी ठरली

पारंपरिक वेशभूषेत आणि डोक्यावर केशरी फेटा बांधलेल्या शेकडो महिलांनी आपल्या दुचाकीसह या रॅलीत सहभाग घेतला.

नगर सेवक विवेक बोढे यांनी रॅलीच्या नियोजनासंदर्भात महिलांना मार्गदर्शन केले. गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रेमलाल पारधी यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून प्रयास सभागृहातून या रॅलीची सुरुवात झाली.

रॅलीमध्ये सहभागी महिलांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ आणि ‘गुढीपाडव्याचा विजय असो’ अश्या घोषणानी परिसर दणाणून सोडला.

ही रॅली शहरातील सर्व प्रमुख मार्गावरून फिरली. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, श्रीराम वार्ड, गांधी चौक, बँक ऑफ इंडिया, पोलिस ठाणे, वियान्नी विद्या मंदिर शाळा, ड्रिमलँड सिटी या भागांचा समावेश होता. रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी महिला दुचाकीस्वारांना शुभेच्छा दिल्या.

रॅलीच्या यशस्वीतेसाठी घुग्घुस प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शीका अर्चना भोंगळे, अध्यक्षा किरण बोढे, नगर सेविका चैताली सातपुते, नगर सेविका वैशाली ढवस, जि. प. माजी सभापती नितु चौधरी, सुनीता पाटील, उषा आगदारी, विना बांगडे, सविता बोढे, भाजपाचे स्वीकृत नगर सेवक निरीक्षण तांड्रा, बबलू सातपुते, सिनू इसारप, विनोद चौधरी, गणेश कुटेमाटे, दिनेश बांगडे, तुलसीदास ढवस, सुरेंद्र भोंगळे, सचिन कोंडावार, धनराज पारखी, सचिन नांदे, विनय बोढे आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here