Home Breaking News कोरपना तहसीलमध्ये अन्न पुरवठा घोटाळ्याचा स्फ़ोट

कोरपना तहसीलमध्ये अन्न पुरवठा घोटाळ्याचा स्फ़ोट

171

कोरपना तहसीलमध्ये अन्न पुरवठा घोटाळ्याचा स्फ़ोट



नितीन बावणे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांचा उठाव


नितेश केराम

कोरपना तहसील कार्यालयातील अन्न पुरवठा विभागातील मनमानी कारभार अखेर उघडीस आला असून तब्ब्ल 6 महिन्यांपासून गरीब महिलांचे स्वस्त धन्य बंद करण्यात आल्याच्या गँभीर प्रकरणामुळे परिसरात तीव्र संताप उसळला आहे या अन्यायाविरोधात नगरसेवक नितीन बावणे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त महिलांनी तहसील कार्यालयावर उठाव पुकारत या प्रकरणाला जोरदार वाचा फोडली निरीक्षण अधिकारी विक्की देवघरे यांच्या कारभारावर गँभीर आरोप होत असून कोणतेही स्पष्ट कारण न देता अंगणवाडी सेविका आशा वर्कर मदतनिस तसेच काही गरीब महिलांचे अन्न धन्य अचानक बंद करण्यात आले आहे महिलांनी दिलेल्या माहिती नुसार अन्न पुरवठा विभाग ( कंट्रोल ) तर्फे मिळणारे नियमित धान्य कोणतीही पूर्वसूचना न देता थांबविण्यात आले

या संदर्भात महिलांनी विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली इतकेच नवे तर काही महिलांशी अश्रीभाशेत वर्तन केल्याचे गँभीर आरोप समोर आले आहेत हे मी केले नाही तहसीलदार मॅडमला विचारा असे सांगत अधिकारी जबाबदारी झटकत असल्याने प्रशासनातील समन्व्ययाचा आभाव स्पष्ट दिसून येतो सर्वांत धक्कादायक आरोप मनजे देवघरे हा अधिकारी अनाज सुरु करून देण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मागणी करत आहे असा गँभीर आरोप संतप्त महिलांनी केला आहे काही अशा महिलांचेही धान्य बंद करण्यात आले आहे की त्या ना अंगणवाडी सेविका आहेत ना आशा वर्कर तरीही त्यांच्या हक्काच्या अन्नधान्यावर गदा आली आहे त्यामुळे गरीब कुतुंबावर अन्याय होत असून उपासमारीचा गँभीर धोका निर्माण झाला आहे

या ठाम भूमिकेमुळे उपस्थित संताप अधिकच उफाळून आला आणि तहसील कार्यालयात जोरदार आंदोलन करण्यात आले नागरिकांनी आरोप केला की कोणतेही कारण न देता धान्य बंद करणे जबाबदारी टाळणे आणि गरीब कुटूबावर उपासमारीच्या दारात ढकलने हा अंत्यत गँभीर प्रकार असून यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे

सद्या या प्रकरणामुळे कोरपना परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून गरिबांना न्याय मिळणार का हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे प्रशासनाने या गँभीर प्रकरणाची तातडीने दाखल घेऊन पारदर्शक चॊकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नगरसेवक नितीन बावणे व संसप्त महिलांकडून देण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here