Home Breaking News सरकारने केवळ महिला विधेयकाचा विचार करावा…!

सरकारने केवळ महिला विधेयकाचा विचार करावा…!

99

सरकारने केवळ महिला विधेयकाचा विचार करावा…!



चंद्रपुर :   स्वातंत्र्यानंतरच्या काळात देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी, पहिल्या महिला राज्यपाल सरोजिनी नायडू, लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती मीराकुमार इतकेच नव्हे तर देशाच्या पहिल्या महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासाठी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व युपीए समन्वय समितीच्या अध्यक्षा माननीया श्रीमती सोनियाजी गांधी यांनीच पुढाकार घेतला होता यावरुन कांग्रेस पक्ष महिलांना सतत सन्मान देत आलेला आहे हे सिद्ध होते. आताच्या मोदी सरकारने चुकीच्या मार्गाने (परिसिमन जोडुन) महिला विधेयक सभागृहात आणले. वास्तविक पाहता विधेयक मंजूर करवून घेण्याची जबाबदारी सरकारची असते. महिला विधेयकाच्या आडुन आपल्या सोईचे परिसिमन विधेयक मंजुर करण्याचा सरकारचा डाव लक्षात आल्याने विरोधी पक्षांनी मोदी सरकार चे हे विधेयक लोकसभेत पाडले. केंद्रातील मोदी सरकारचा १२ वर्षाच्या काळात प्रथमच मोठा पराभव झाल्याने तो पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याचे त्यांच्या अलिकडच्या वक्तव्यावरून वाटते आहे. अन् म्हणूनच ते देशाचे विरोधी पक्षनेते माननीय राहुल गांधी जी यांच्यावर आगपाखड करताना सोशल मीडियावर दिसत आहे. अशा प्रकारची प्रतिक्रिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील नामांकित गोंडवाना विद्यापीठातुन मास कम्युनिकेशन ची पदवी मेरीट श्रेणीत उत्तीर्ण केलेल्या महिला पत्रकार तथा एम.ए.हिंदी गोल्ड मेड्यालीस्ट कु. माधुरी दीपक कटकोजवार यांनी व्यक्त केली आहे. त्या राजकीय क्षेत्रात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्षा या पदावर कार्यरत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here