Home Breaking News आदिवासींची मतं हवीत, पण आदिवासींच्या लेकींची सुरक्षा नको? आदिवासी मंत्री महोदय, उत्तर...

आदिवासींची मतं हवीत, पण आदिवासींच्या लेकींची सुरक्षा नको? आदिवासी मंत्री महोदय, उत्तर द्या!” – सौ. इंदिरा बोंदरे यांचा रणशिंग

97

आदिवासींची मतं हवीत, पण आदिवासींच्या लेकींची सुरक्षा नको? आदिवासी मंत्री महोदय, उत्तर द्या!” – सौ. इंदिरा बोंदरे यांचा रणशिंग



पांढरकवडा-यवतमाळ स्वतंत्र अभ्यास आयोग स्थापन करण्यासाठी पायदळ मार्च कडे डोकावून बघितले नसल्याचा आरोप करून दिला दाखला.

यवतमाळ/राळेगाव: “ज्या आदिवासींच्या मतांवर तुम्ही निवडून आले, मंत्री झालात, त्याच समाजाच्या लेकींची उघडपणे विक्री होत असताना तुम्ही गप्प कसे? आदिवासी समाज सुरक्षित आहे काय? याचे उत्तर आता द्यावेच लागेल,” असा संतप्त सवाल शामा दादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे यांनी आदिवासी विकास मंत्र्यांना प्रसिध्दी पत्रकातून विचारला आहे. राळेगाव तालुक्यातील ३४ मुलींच्या तस्करी प्रकरणावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.

यावेळी बोलताना सौ. बोंदरे यांनी मंत्र्यांच्या आणि प्रशासनाच्या संवेदनाहीनतेचा पाढाच वाचला:

१. पायदळ मार्चचा विसर पडला काय?

कोलाम जमातीच्या स्वतंत्र अभ्यास आयोगासाठी आम्ही पांढरकवडा ते यवतमाळ असा मैलोनमैल पायदळ ‘लाँग मार्च’ काढला. प्रकल्प कार्यालय पांढरकवडा हे कोलाम जमातीचे पालक कार्यालय असूनही आंदोलनकर्त्यांना पिण्याच्या पाण्याची एक बाटली देण्याचे सौजन्य प्रशासनाने दाखवले नाही. आमच्या पायाला फोड आले, आम्ही रक्ताचं पाणी केलं, पण मंत्री महोदय शहरात असूनही साधी भेट द्यायला आले नाहीत. ही कसली लोकशाही आणि कसले आमचे लोकप्रतिनिधी?

२. तुम्ही आणि तुमचे सरकार जबाबदार!

हक्काचा लढा लढत असताना आमच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले. समाजात आज ज्या विकृत घटना घडत आहेत, ३४ आदिवासी मुलींची तस्करी झाली आहे, त्याला सर्वस्वी आदिवासी मंत्री आणि हे निष्क्रिय सरकार जबाबदार आहे. जर तरुणांच्या हाताला काम आणि समाजाला न्याय मिळाला असता, तर आज ही वेळ आली नसती.

३. आदिवासींच्या जखमेवर मीठ चोळू नका:

प्रकल्प कार्यालयातील योजना फक्त कागदावरच नाचवल्या जात आहेत. आदिवासी विकास मंत्री स्वतःच्या मतदारसंघातल्या आदिवासी मुली वाचवू शकत नसतील तर त्यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही आदिवासी महिलांच्या सक्षमीकरनाच्या बाता मारणाऱ्या मंत्र्याच्या राज्यात सोडा पण स्वतः च्या मतदार संघात आदिवासी मुलींची अल्पवयात उघड विक्री होणे हे जिल्ह्याचे दुर्दैव आहे आता आदिवासी मतदाराचा फक्त आदेश चालेल सौ इंदिरा बोंदरे यांनी संघटनेच्या विशेष प्रसिध्दी पत्रकात ठणकावून सांगितले की आता विनंतीची वेळ गेली आहे लवकरात लवकर पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक आयोजित करून पायदळ लाँग मार्च यशस्वी करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले अतुल आत्राम, गुरुदेव घोडणारे, राहुल चीचघाटे, सुनील महाराज, सुधाकर चांदेकर विष्णू सुरपाम सहित एकता ग्रुप खैर गाव देशमुख विघ्नहर्ता ग्रुप झोटिंगदरा पुंडलीक टेकाम सहित साहित्यिक तज्ञ लोकांना घेवून बैठक आयोजित करून स्वतंत्र अभ्यास आयोग स्थापन करा अन्यथा ज्या आदिवासी मतदाराने खुर्चीवर बसविले तेच मतदार तुम्हाला जिल्ह्यात फिरू देणार नाही तस्करांना तत्काळ अटक करून बेपत्ता झालेल्या मुलींना परत न आणल्यास शामादादा कोलाम ब्रिगेड आपल्या घरावर धडक देईल असा इशारा ही शेवटी दिला

सौ इंदिरा बोंदरे प्रदेश अध्यक्षा शामादादा कोलाम ब्रिगेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here