Home Breaking News तालुकास्तरीय ग्रामजयंती व कार्यकर्ता मेळावा संपन्न

तालुकास्तरीय ग्रामजयंती व कार्यकर्ता मेळावा संपन्न

77

तालुकास्तरीय ग्रामजयंती व कार्यकर्ता मेळावा संपन्न



व्याहाड खुर्द येथे गुरुदेव भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग


सावली (प्रतिनिधी)

सावली – खंजिरीच्या माध्यमातून संपूर्ण विश्वाला मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराज यांचा जन्मोत्सव म्हणजे ‘ग्रामजयंती’ महोत्सव व कार्यकर्ता संमेलन व्याहाड खुर्द येथे संपन्न झाला.
राष्ट्रसंत तुकड़ोजी महाराजांच्या जयंती निमित्त ग्रामजयंती उत्सव साजरा केल्या जातो. गुरुदेव सेवा मंडळ सावली तालुकाच्या वतीने तालुकास्तरीय ग्रामजयंती व कार्यकर्ता मेळावा व्याहाड खुर्द येथे गुरुवारी व शुक्रवारी पार पडला. यावेळी सामुदायिक प्रार्थना, भजन, रामधून काढत राष्ट्रसंताचे विचार, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान पोहचविण्याचे काम करण्यात आले. मेळाव्यात राष्ट्रसंतांचे विचार, ग्रामगिता, व्यसनमुक्ती, ग्रामसुधारणा, सर्वधर्मसमभाव यावर मान्यवरानी प्रकाश टाकला. माझी वसुंधरा अभियान स्पर्धेत राज्यात प्रथम येणाऱ्या चिखलीच्या सरपंच रेखाताई बानबले व दुसरा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या जिबगावचे सरपंच पुरषोत्तम चुधरी व सावली येथील समाजसेवक परेश तावाडे यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर गुरुदेव सेवा मंडळाचे विदर्भ प्रांत सेवाधिकारी विठ्ठलजी सावरकर, चंद्रपूर जिल्हा सेवाधिकारी अशोकजी चरडे, ग्रामगिताचार्य शरद सहारे, ग्रामगीताचार्य गणेश मांडवकर, मधुसूदन फाले, लीलाधर नागोसे, जानिवंत घोडमारे, रमेश बोरुले , गंगाधरराव चुधरी, सुधाकरराव गाडेवार, विजय कोरेवार,डॉ.शेखर प्यारमवार नरेश सुरमवार, राजू तुंडूलवार, दिलीप ठीकरे, भाविका मुरतेली, इंदिरा राऊत आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी नवीन पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुदेव सेवा मंडळ सावली तालुका अध्यक्ष विनोद बांगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here