Home Breaking News रिपाइंचा चंद्रपूर जिल्हा कार्यकर्ता मेळावा संम्पण

रिपाइंचा चंद्रपूर जिल्हा कार्यकर्ता मेळावा संम्पण

109

रिपाइंचा चंद्रपूर जिल्हा कार्यकर्ता मेळावा संम्पण



नितेश केराम

महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातींचे घटनाबाह्य उपवर्गीकरण करण्याचा घाट घातला आहे उपवर्गिकरणामुळे अनुसूचित जातीमध्ये भेदभाव स्पर्धा व अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सामाजिक एक्याला धक्का बसणार आहे या सर्व गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र राज्यात अनुसूचित जातींचे उपवर्गिकरण करू नये त्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया पूर्ण ताकदीने विरोध करणार आहे

बाबासाहेबांनी आपणाला जात धर्म विरहित बोद्ध धम्म दिला असून येणाऱ्या जनगनेत बोद्धानी बोद्ध धम्म तसेच पाली भाषेची नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले

सदर प्रसंगी प्रत्येक तालुक्याचे पदाधिकारी यांनी आपल्या तालुक्यात सुरु असलेल्या पक्षाचे कामाची माहिती दिली काम करण्यास येणाऱ्या अडचणी सांगितल्या मेळाव्यात वर्ष भर करण्यास येणाऱ्या कामाचे नियोजन करण्यात आले जिल्हा स्तरावर ठोस निर्णय घेऊ कार्यकर्ता सक्रिय व अपडेट ठेवण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली

दि 26 एप्रिल 2026 ला दुपारी 2:00 वाजता स्थळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रiम गृहात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचा कार्यकर्ता मेळावा संम्पण झाला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष मोरेश्वर चंदनखेडे हें होते

मेळाव्याला जेष्ठ व नागपूर प्रदेश उपाध्यक्ष नेताजी बुरचुडे महाराष्ट्र प्रदेश चिटनीस अशोककुमार उमरे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस गोपाळ रायपुरे माजी जिल्हाध्यक्ष बाजीराव उंदीरवाडे नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन यांनी मार्गदर्शन केले

तसेच जिल्हा महासचिव प्रा ड्रा रवींद्रनाथ पाटील जिल्हा कोषाध्यक्ष गुरूदास रामटेके युवा जिल्हाध्यक्ष सूरजभाऊ उपरे नंदा रामटेके सरिता लोणारे उज्वला नगराळे संतोषभाई रामटेके आनंद जगताप डी जी दुर्गे हंसराज ताकसांडे इत्यादीने पक्ष वाढीसाठी जिल्ह्यातील 15 तालुक्यातील गावागावात जाऊन गाव तिथे शाखा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेऊन काम करण्याचा संकल्प करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here