कोरपना ग्रामीण रुग्णालयाचा रामभरोसे कारभार वैद्यकीय अधीक्षकांचा मुखालयाला खो
दोन महिन्यापासून साहेबांची खुर्ची रिकामीच सी सी टीव्ही तपासल्यास सत्य येईल समोर
नितेश केराम
कोरपना येतील ग्रामीण रुग्णालयाची अवस्था सद्या ओंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशी झाली आहे रुग्णालयाचे सर्वेसर्वा असलेले वैद्यकीय अधीक्षक मागील दोन महिन्यापासून रुग्णालयात फिरकलेच नसल्याची खळबळजनक चर्चा परिसरात रंगत आहे अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभारामुळे रुग्णांचे हाल होत असून प्रशासनावर कोनाचाही वचक राहिला नाही दिसून येत आहे
शासकीय नियमानुसार वैद्यकीय अधीक्षकांनी मुख्यालयात राहाने बंधनकारक असतांना कोरपना ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक नेमके कुठे आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे मागील दोन महिन्यापासून त्यांनी रुग्णालयात पाऊलही ठेवले नसल्याचे बोलले जात आहे वरिष्ठ अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत की काय अशी शंका आता नागरिक व्यक्त करत आहेत
रुग्णालयातील सावळागोंधळ चव्हाट्यावर आनण्यासाठी जास्त पुराव्याची गरज नाही वरिष्ठ यांनी केवळ मागील दोन महिन्यातील रुग्णालयाचे सीसीटीव्ही कमेरे ( CCTV ) आणि हजेरी पटाची तपासणी केल्यास सर्व प्रकार उघडकीस येऊ शकतो सीसीटीव्हीमध्ये साहेब किती वेळा आले आणि किती वेळ थांबले याचा दूध का दुध पाणी का पाणी होईल अशी मागणी जोर धरत आहे
ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्ण मोट्या आशेने या रुग्णालयात येतात मात्र मुख्य अधिकारी गायब असल्याने कर्मचाऱ्यांवर कोनाचेही नियंत्रण नाही परिणामी आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून सामान्य जनतेला खासगी रुग्णालयांचा रस्ता धरावा लागत आहे
आता या प्रकरनांची दखल घेऊन जिल्हा शल्य चिकित्सक या बेपत्ता अधीक्षकांवर काय कारवाई करता याकडे सम्पूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे