Home Breaking News विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस इच्छुकांनी अर्ज सादर करावे ।

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस इच्छुकांनी अर्ज सादर करावे ।

88

विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस इच्छुकांनी अर्ज सादर करावे ।



काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे आवाहन


नितेश केराम

राजुरा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्दशानुसार विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत या पार्शभूमीवर चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी जिल्ह्यातील पदाधिकारी व इच्छुक कार्यक्त्यांनी वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड गणेश पाटील यांनी जरी केलेल्या पत्रानुसार निवडणूक आयोगाने विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 1 जून 2026 आहे तर मतदान प्रक्रिया 18 जून 2026 रोजी पार पडणार आहे या अनुषंगाने काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज तातडीने मागविण्यात आले असून संबंधित माहितीसह अर्ज 25 मे 2026 पर्यंत चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कार्यालयाकडे सादर करण्यात यावे असे आवाहन माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी जिल्हातील सर्व काँग्रेस पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यकर्ते व इच्छुक उमेदवारांना केले आहे या निवडणुकीच्या पार्शभूमीवर काँग्रेस पक्षात राजकीय हालचालींना वेग आला असून इच्छुकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here