Home Breaking News शेतकरी संघटना जनसंपर्क कार्यालय राजुरा

शेतकरी संघटना जनसंपर्क कार्यालय राजुरा

94

शेतकरी संघटना जनसंपर्क कार्यालय राजुरा 

प्रज्वल सुरेश साळवे यांची अग्निवीर सैनिक म्हूणन निवड ऍड वामनराव चटप यांच्या हस्ते सत्कार 

नितेश केराम

राजुरा तालुक्यातील मौजा विहिरगाव येतील राहिवासी प्रज्वल सुरेश साळवे यांची भारतीय सैन्यात अग्निवीर सैनिक म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार ऍड वामनराव चटप यांच्या हस्ते तसेच उपस्थित श्री रमेश नळे सुरेश साळवे प्रभाकर ढवस ड्रा बोढे नानाजी साळवे कपिल इदे मधुकर चिंचोलकर संभाजी झाडे अरुण साळवे नामदेव अस्वले सौरभ मादासवार सुरेश साळवे ( वडील ) आशा साळवे ( आई ) या सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रज्वल साळवे यांना शाल श्रीफळं पुष्पगुछ व प्रेरणादायी पुस्तकं देऊन सन्मानित करण्यात आले

मौजा विहिरगाव येतील निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात उपस्थितांनी प्रज्वल यांच्या यशाबद्दल अभिनंदन करून त्यांच्या भावी कारकिदीस शुभेच्छा दिल्या प्रज्वल यांच्या निवडीमुळे गावासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवकांसाठी त्यांनी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे

देशसेवेचे संधी मिळाल्याबद्दल उपस्थितांनी प्रज्वल साळवे यांचे कौतुक करत त्यांच्या उजवलं भविष्यासाठी शुभेच्छा वर्षाव केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here