नागरीकांना चालण्यासाठी असणा-या फुटपाथवरील अतिक्रमण मनपा ने त्वरित हटवावे
राष्ट्रवादी (श.प) युवती जिल्हाध्यक्षा जर्नलिस्ट माधुरीताई कटकोजवार यांची मागणी*
चंद्रपूर
चंद्रपूर शहर महानगर पालिका क्षेत्रातंर्गत मुख्य दोन मार्ग आहेत. त्यात प्रामुख्याने मनपा कार्यालयाजवळुन गांधी चौकातुन मुख्य मार्गाने जटपुरा गेट ला वळसा घेऊन कस्तुरबा मार्गाने परत गिरणार चौक ते गांधी चौक असा वन वे आहे. या दोन्ही मार्गावर महानगर पालिकेच्या माध्यमातून पाददळ चालणा-या नागरीकांसाठी फुटपाथ चे निर्माण करण्यात आले. जेणेकरून दुचाकी, तिनचाकी व चारचाकी वाहनांच्या वाहतुकीला अडथळा येवून कोंडी होवू नये. परंतु प्रत्यक्षात या दोन्ही मार्गावर असणा-या दुकानदारांनी फुटपाथवर जवळपास पुर्णपणे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पायदळ चालणा-या नागरीकांना नाईलाजास्तव रोडवरुन चालावे लागते. व त्याचा परिणाम वाहतुकीची कोंडी होण्यात होतो. कधी कधी तर पायदळ चालणा-या नागरिकांना वाहनांचे टच होवुन किरकोळ जखम पण होताना आढळले आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेने या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन येत्या आठवडाभरात या दोन्ही मार्गावरील फुटपाथवर होत असणारे दुकानांचे अतिक्रमण कायम स्वरुपी हटवून चंद्रपूरकरांना दिलासा द्यावा अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षा जर्नलिस्ट कु.माधुरीताई कटकोजवार (मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन) यांनी केलेली असुन याबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष सौ.बेबीताई उईके व ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य यांचेशी चर्चा केली असल्याची माहिती जर्नलिस्ट माधुरी कटकोजवार यांनी दिली आहे.