Home Breaking News कोरपना नगरीत बंदरांचा वाढता उपद्रव वन विभागाने तातडीने कारवाई करावी अशी नागरिकांची...

कोरपना नगरीत बंदरांचा वाढता उपद्रव वन विभागाने तातडीने कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी

60

कोरपना नगरीत बंदरांचा वाढता उपद्रव
वन विभागाने तातडीने कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी



नितेश केराम
कोरपना शहरात गेल्या काही दिवसांपासून बंदरांचा उपद्रव मोट्या प्रमाणात वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बंदरांचे कळप घरांच्या छतावर झाडांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी मुक्तपणे वावरात असल्याने लहान मुले जेष्ठ नागरिक आणि महिलांना त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांच्या म्हण्यानुसार बंदरे घरांमध्ये घासून अनधान्य व फळभाज्यांचे नुकसान करत आहेत तसेच जाण्याच्या घटणा घडल्याचेहि सांगितले जात आहे त्यामुळे अपघात किंवा जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत वन विभागाने तातडीने दखल घेऊन बंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी योग उपयोजना कराव्यात अशी मागणी कोरपना शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे प्रशासनाने वेळेत कारवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here