गडचिरोली जिल्हा मेळाव्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांनी मोट्या संखेने उपस्थित राहावे
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना NGP 5825 चे आवाहन
नितेश केराम
चामोर्शी : महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना NGP 5825 च्या वतीने शनिवार दि 10 ऑक्टॉबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता बालाजी सभागृह गडचिरोली रोड चामोर्शी येथे भव्य गडचिरोली जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याला गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांनी मोट्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे राज्यध्यक्ष श्री विलास भाऊ कुमरवार सरचिटणीस श्री दयानंद एरंडे आणि कोरपना तालुका अध्यक्ष तथा जिल्हा संघटक श्री मंगेश विलास चिंचोलकर यांनी केले आहे
ग्रामपंचायत कर्मचारी हें ग्रामीण प्रशासनाचा महत्वाचा आधारस्थमं असून गावाच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे ग्रामपंचायतीची दैनंदिन कामे शासकीय योजणांची अंमलबजावणी आणि नागरिकांना विविध सेवा पुरविण्याची जबाबदारी कर्मचारी प्रामाणिकपणे पार पडतो असतात मात्र कर्मचाऱ्यांना वेतन प्रलंबित थकबाकी सेवा सुविधा आणि इतर प्रलंबित प्रश्नसाठी संघर्ष करावा लागत आहे
या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या व न्याय मागन्यांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी कर्मचाऱ्यांमद्ये संघटनात्मक एकजूट निर्माण करण्यासाठी तसेच पुढील आंदोलनात्मक व संघटनात्मक दिशा निश्चित करण्यासाठी या जिल्हा मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त आहे
संघटनेची ताकद ही कर्मचाऱ्यांच्या एकजूटीत आहे आपल्या न्याय हक्कानंसाठी प्रत्येक ग्रामपंचायत कर्मचारी बांधवाने संघटित होहून या मेळाव्यात सहभागी होणे आवश्यक आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी बांधवांनी कोणताही संकोच न बाळगता मोट्या संखेने उपस्थित राहुन मेळावा यशस्वी करावा असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे
मेळाव्याचा तपशील
दि शनिवार 10 ऑक्टॉबर 2026 वेळ सकाळी 11 वाजता
स्थळ बालाजी सभागृह गडचिरोली रोड चामोर्शी
आवाहनकर्ते
श्री विलास भाऊ कुमरवार राज्यध्यक्ष
श्री दयानंद एरंडे सरचिटणीस
श्री मंगेश विलास चिंचोलकर कोरपना तालुका अध्यक्ष तथा जिल्हा संघटक
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना NGP 5825 जिल्हा चंद्रपूर