Home चंद्रपूर शेणगाव येथील विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

शेणगाव येथील विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

97

शेणगाव येथील विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

घुग्गूस : चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील काँग्रेस तथा इंडिया आघाडीच्या उमेदवार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शेणगाव येथील भाजप कार्यकर्ते रमेश धांडे व त्यांच्या धर्मपत्नी रंजना धांडे,राष्ट्रवादीचे गौरव ठावरी,विशाल खणके,गणेश भोयर,प्रकाश बरडे,साहिल जेणेकर,रितेश खारकर,प्रफुल्ल धांडे,निखिल वैद्य,यांच्या सह अन्य कार्यकर्त्यांनी काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल नरुले, व घुग्गूस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते पक्षाचे दुपट्टे घालून काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला.

शेंनगाव येथील काँग्रेस कार्यकर्ते भास्कर सोनेकर यांनी दिनांक 03 एप्रिल रोजी सांयकाळी 07 वाजताच्या सुमारास गावात एका छोटयाखानी प्रचार सभेचे आयोजन केले होते.

यात प्रमुख पाहुणे म्हणून तालुकाध्यक्ष अनिल नरुले,काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी,कामगार नेते सैय्यद अनवर, सोनेगावचे माजी सरपंच संतोष बांदूरकर यांना आमंत्रित केले होते
मंचावर उपस्थित नेत्यांनी देशातील वास्तविकता युवकांन समोर ठेवली असता युवकांनी मोदी शासनाच्या हुकूमशाही विरोधात एकत्रितपणे लढा देण्यासाठी काँग्रेस व इंडिया आघाडी सोबत जाण्याचा निर्णय घेतला याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे किशोर आवळे, अलीम शेख,दीपक मित्रा,सोशल मिडिया लोकसभा समन्वयक रोशन दंतलवार,विजय माटला,विशाल मादर,इंटक जिल्हा उपाध्यक्ष अनुप भंडारी व मोठ्या संख्येने गावातील महिला व पुरुष उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here