क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले महिलांच्या हक्कासाठी लढा देण्याऱ्या थोर समाजसुधारक: किरण बोढ
आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
घुग्घुस: येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शनिवार, ३ जानेवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नगर सेवक विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना किरण बोढे म्हणाल्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाला परिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. त्या काळात विरोध असून सुद्धा मुलींसाठी शाळा सुरु केल्या, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा दिला, अस्पृश्यतेविरोधात आवाज उठवला, केशवपन बंद करण्यासाठी प्रबोधन केले, महिलांसाठी पुनर्विवाहाच कायदा व्हावा यासाठी प्रयत्न केले. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा विरोध करीत समाजकंटकांनी त्यांचा अंगावर शेणही फेकले तरी सुद्धा त्यांनी आपला संघर्ष सुरूच ठेवला. सावित्रीबाई फुले यांनी समाजाला सत्कार्याचा आदर्श दिला. ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्म दिवस बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्याला मी अभिवादन करते.