Home Breaking News मुख्यमंत्रीचा दौरा असल्याने चंद्रपूर शहरातील वाहतुक व्यवस्थेमधील बदल

मुख्यमंत्रीचा दौरा असल्याने चंद्रपूर शहरातील वाहतुक व्यवस्थेमधील बदल

25

मुख्यमंत्रीचा दौरा असल्याने चंद्रपूर शहरातील वाहतुक व्यवस्थेमधील बदल



दिनांक ०४ जानेवारी, 2026 रोजी मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुबंई यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा कार्यक्रम असून सदर कार्यक्रम दरम्यान मा. मुख्यमंत्री महोदय यांचे सकाळी १०:०० वाजता ते दुपारी ०१:०० वाजता दरम्यान अंचलेश्वर गेट ते जटपुरा गेट या मुख्य मार्गवर रैलीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर रोड शो रैली मध्ये चंद्रपूर जिल्हयातील तसेच बाहेर जिल्हयातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन तसेच रैली दरम्यान वाहतुकीला अडथळा होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या मार्गा वरील सर्व वाहतुक बंद ठेवणे आवश्यक आहे.

करीता खालील नमूद मार्ग वेळेनुसार बंद करण्यात येतील. नागरिकांनी शक्यतो या मार्गाचा वापर करण्यास टाळावे.

नागरीकांनी बागला चौक अंचलेश्वर गेट-गांधी चौक जयंत टॉकीज चौक-जटपुरा गेट तसेच संजय लस्सी सेंटर गिरणार चौक या मार्गाचा वापर अत्यावश्यक कामाशिवाय करू नये.

रैलीच्या कालावधीत वाहतुकदारांनी पुढील पर्यायी मार्गाचा वापर करावा.

१) बल्लारपूर कडून येणारे नागरिक तसेच लालपेठ कॉलरी, बाबुपेठ, बागला चौक या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्यासाठी व परत येण्यासाठी राजीव गांधी इंजीनीयरींग कॉलेज लालपेठ एरीया हॉस्पीटल – पठाणपुरा गेट या मार्गाया वापर करावा. सदरचा मार्ग हा मोटर सायकल व ऑटो तसेच लहान वाहनांसाठी राहील तसेच शहराबाहेर इतरत्र जायचे असल्यास नागरिकांनी कामगार चौक मार्गे बल्लारपूर चंद्रपूर बायपास या मार्गाचा वापर करावा.

२) -नागपुर व मुल कडुन शहरामधील पंचशिल चौक, श्री टॉकीज चौक, पठाणपुरा परीसर वार्ड मध्ये जाणाऱ्या सर्व नागरिकांनी (जड वाहने वगळून) वरोरा नाका मित्र नगर चौक जेष्ठ नागरीक भवन संत केवलराम चौक विदर्भ हाउसिंग चौक बिनवा गेट मार्गाचा वापर करावा. –

३) पठाणपुरा वार्ड, बालाजी वार्ड, विठ्ठल मंदीर वार्ड या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहराचे बाहेर जाण्यासाठी तसेच परत येण्यासाठी मिलन चौक बिनबा गेट रहमत नगर संत केवलराम चौक -विदर्भ हॉउसिंग चौक या मार्गाचा वापर करावा. –

तरी नागरीकांनी रैली दरम्यान वरील पर्यायी मार्गचा वापर करून शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखणे कामी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here