*वणी पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात संपन्न*
*वणी* — आज दिनांक 3 जानेवारी 2026 रोजी वणी पब्लिक स्कुल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंतीनिमीत्य अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाला जेष्ठ शिक्षीका सौ अश्लेषा जेणेकर व सौ.अनुपाली खोब्रागडे यांनी सावित्रीबाई फुले यांचे जिवनावर मार्गदर्शन केले.याप्रसंगी राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.अभय पारखी सरांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले.कार्यक्रमाचे संचालन सौ.वंदना बाविस्कर मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन तेजस्विनी झाडे यांनी मानले.यशस्वीतेसाठी शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारयांनी अथक प्रयत्न केले.