Home Breaking News हनुमान जयंतीनिमित्त घुग्घुस येथे स्वच्छता अभियान उत्साहात

हनुमान जयंतीनिमित्त घुग्घुस येथे स्वच्छता अभियान उत्साहात

102

हनुमान जयंतीनिमित्त घुग्घुस येथे स्वच्छता अभियान उत्साहात



घुग्घुस : पवनपुत्र हनुमान यांच्या जयंतीचे औचित्य साधत “आई फाऊंडेशन बहुउद्देशीय संस्था” घुग्घुस यांच्या वतीने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. संत गाडगेबाबा यांच्या ग्रामस्वच्छता अभियानाच्या प्रेरणेने आयोजित या उपक्रमात गावातील मुख्य रस्त्यावर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.

या अभियानात गुरुदेव सेवा मंडळाच्या अध्यक्षा व पदाधिकाऱ्यांसह गावातील प्रथम नागरिक नगराध्यक्षा मा. सौ. दिप्ती ताई सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिकांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांना परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. “स्वच्छ गाव, सुंदर गाव” हा संदेश देत सर्वांनी स्वच्छतेबाबत जनजागृती केली.

तसेच संस्थेच्या वतीने कार्यक्रमा अंती स्वच्छता दुताचा शॉल व पाणी बोटल देऊन सन्मानित करण्यात आले या उपक्रमामुळे गावात स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. संस्था भविष्यातही अशाच सामाजिक उपक्रमांद्वारे जनसेवा करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आयोजकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here