रहमत नगर वार्डमध्ये गांजा साठवणूक व विक्री प्रकरण उघड;
८ किलोहून अधिक अमली पदार्थ जप्त
चंद्रपूर :
चंद्रपूर शहरातील रहमत नगर परिसरात अमली पदार्थ (गांजा) साठवून विक्री करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ८ किलोहून अधिक गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे।
दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार अब्दुल शाहरुख अब्दुल रज्जाक (वय ३५, रा. दर्गा वॉर्ड, घुटकाळा, चंद्रपूर) आणि त्याचा साथीदार मोबीन (रा. चंद्रपूर) यांनी रहमत नगर येथील KGN लॉन जवळ साबीराबी रफीक शहा यांच्या घरातील एक खोली भाड्याने घेऊन तेथे गांजाचा साठा करून ठेवला आहे।
या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. झडतीदरम्यान भाड्याने दिलेल्या खोलीत एका पिवळ्या रंगाच्या पोत्यामध्ये प्लास्टिक पिशव्यांत साठवलेला हिरवट रंगाचा सुकलेला गांजा आढळून आला. या गांजामध्ये पाने, फुले, देठ व बिया यांचा समावेश होता।
जप्त करण्यात आलेल्या गांजाचे एकूण वजन सुमारे ८ किलो ९१५ ग्रॅम असून त्याची बाजारातील किंमत अंदाजे ८१ हजार १५० रुपये इतकी आहे. हा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे।
या प्रकरणी आरोपी अब्दुल शाहरुख अब्दुल रज्जाक आणि मोबीन यांच्या विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे।
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन तसेच अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, सर्वेश बेलसरे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली आहे।
या कारवाईमुळे शहरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात