Home Breaking News गुडसेला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त...

गुडसेला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण*

22

गुडसेला येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त पुतळ्याचे अनावरण*

चंद्रपुर :  मौजा गुडसेला तालुका जिवती जिल्हा चंद्रपूर येथे तारीख १३ एप्रिल २०२६ ला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एकाच चबुतऱ्यावर संयुक्त पुतळ्याची उभारणी करण्यात आली.

बाबासाहेबांवर, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या चळवळीवर जिवापाड प्रेम करणारे सर्व समाजात असल्यामुळेच बौद्ध समाजाचे एकही घर नसलेले गाव. बाबासाहेबांपासून प्रेरणा घेतलेल्या या गावात पुर्णतः मातंग समाजातील लोकवस्ती असलेल्या गुडसेला सारख्या गावात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक असून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एकाच चबुतऱ्यावर संयुक्त पुतळे उभारण्यात आले आहेत. एकीकडे अनुसूचित जातीचे वर्गीकरण करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू असताना गुडसेला सारख्या गावात महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एकाच चबुतऱ्यावर संयुक्त पुतळ्याची उभारणी ही सामाजिक अभिसरणाची दिशा बदलविणारी घटना आहे.

संयुक्त पुतळ्याचे अनावरण प्रिया खाडे अध्यक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) यांनी केले. याप्रसंगी गौतम तोडे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), अशोककुमार उमरे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेश चिटणीस, विक्की वानखेडे चंद्रपूर, प्रभाकर खाडे कोरपना तालुका अध्यक्ष रिपाइं (आठवले), गौतम भसारकर गडचांदूर, प्रगती भोसले चंद्रपूर, नभिलास भगत जिवती, पुतळा समितीचे अध्यक्ष चंद्रमणी वाघमारे, तिरूपती बटवाडे, शाहिर अंकुश मोरे, आनंद हरगिले, बळीराम मेकाले, रामा कुंटेवाड, बालाजी कांबळे,‌ शरद वाटोरे, भानुदास जाधव, सुग्रीव पटवाडे, प्रशांत मोरे, आनंद पवार, मारोती कांबळे, शाम दासरे, ज्ञानेश्वर पवार, पंढरी ढगे, रमेश कांबळे, गोविंद नामपल्ले, अशोक नामपल्ले, रणजित मसूरे, श्रीकांत राजपंगे, हरी भोगे, अरूण भोगे, गोविंद पटवाडे, वसंत मोरे, बालाजी मोरे, पंडित कांबळे इत्यादी कार्यकर्ते महिला आबालवृद्ध याप्रसंगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here