महाराष्ट्र तेलंगणा सिमेलगत असलेल्या परमडोली येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
नितेश केराम
जिवती ऍड दीपक चटप यांनी मनोगत व्यक्त करताना शिक्षणाचे महत्व व बाबासाबांची प्रेरणा यांवर मत मांडले वादग्रस्त 12 गावे व 2 गुडे आणि जिवती तालुक्यातील वनजमिनीवरील पट्याचा प्रश्न सोडविण्यात सत्ताधाऱ्यां ना अपयश आले असे स्पष्टपणे मांडले त्याचप्रमाणे हे दोन्ही प्रश्न केंद्रात राज्यात सत्ता असणाऱ्या पक्षातील लोकप्रतिनिधी आमदार यांनी लवकर सोडवणार असल्याचे दिलेले आश्वासन फोल असल्याचे त्यांनी मांडले वनहक्क कायद्यातील दुरुस्ती करण्याचे अधिकार केंद्र सरकारला असून कायद्यातील तीन पीडयाची अट रद्द झाल्याशिवाय मातंग बोद्ध बंजारा धनकर हटकर आदी गैआदिवासी समुदायांना वनजमिनीवर पटे मिळूच शकणार नाही हे देखील त्यांनी मांडले यावेळी उपस्थित लोकांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
या कार्यक्रमात आमदार देवराव भोंगळे वक्ते राजकुमार चिकटे सामाजिक कार्यकर्ते सुग्रीव गोतावळे बालाजी कांबळे लक्ष्मण कांबळे बालाजी सोनकांबळे रामदास रणवीर सुबोध चिकटे सूरज चिकटे गुवन्ता आडे धनराज कांबळे आदीसह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते