सेवानिवृत्त भारतीय सैनिक मनोज आडे यांची ग्रामस्थांकडून सत्कार
नितेश केराम
कोरपना / तालुक्यातील कोल्हापूर गुडा या छोट्याशा खेडेगावात असलेले निवृत्त सैनिक मनोज देवराव आडे यांनी नुकतेच भारतीय सैनिक सेवेमधून निवृत्तीची घोषणा केली अगदी वयाच्या लहानपणापासून मनामध्ये सैनिक बनण्याची आणि देशावर प्रेम करण्याची भावना असणे हें अत्यँत अभिमानास्पद आणि मोलाचे आहे देशाच्या रक्षणासाठी आपल्या आयुष्याची महत्वाची 18 वर्ष देशसेवेची सीमेवर सेवा करत सुखरूप घरी परतल्यावर जवानाची ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला
आज बैलपोळा या सनानिमित्ताने कोल्हापूर गुडा येतील प्रथम नागरिक गावपाटील मंगेश पंधरें यांच्या नेतृत्वात या सेवानिवृत्त सैनिकाचा सन्मान म्हूणन कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आला होता
यावेळी समारंभाला उपस्थित गावचे प्रतिष्टीत नागरिक गजानन पंधरें सामाजिक कार्यकर्ते गुलाब मेसराम बाळा मडावी रामकृष्णा पंधरें अजय कुमरे अरविंद परचाके अंकुश मडावी व कोल्हापूर गुडा येतील समस्त ग्रामस्थ उपस्थित होते










