तर इलेक्ट्रॉनिक विद्युत मिटर सक्ती विरोधात प्रतिकात्मक मिटर ची होळी
अन्यायकारक दरवाढ त्वरित कमी करा: जिल्हाध्यक्षा बेबीताई उईके यांचा इशारा
चंद्रपुर: भाजपा एनडीए सरकारचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेशी मन की बात करत असतानाच देशभरात पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडर ची दरवाढ भरमसाठ केल्याने सामान्य जनतेला जिवन जगणे कठीण झाले आहे. गृहीणी ला स्वयंपाक करण्यासाठी लागणारे गॅस सिलेंडर च्या किंमतीत 29 रुपयाने सरसकट वाढ केल्याने तसेच छोट्या व्यवसायिकांसाना लागणा-या सिलेंडरच्या दरात ही दरवाढ करुन एक प्रकारे जनतेवर अन्याय केलेला आहे. या दरवाढीचा निषेधार्थ चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चंद्रपूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्षा सौ. बेबीताई उईके यांचे नेतृत्वात जोरदार नारेबाजी करीत आंदोलन छेडण्यात आले. एकीकडे देशातील जनतेला अच्छे दिना चे वादे करत असताना दुसरीकडे मोदी सरकारने देशातील गोरगरीब आणि सामान्य जनतेला महागाईच्या खाईत ढकललेलं आहे असे म्हटल्यास काहीच वावगे ठरणार नाही.
आपल्याला खरोखरच गोरगरीब आणि सामान्य माणसाच्या जीवन जगण्यासाठीचा खऱ्या अर्थाने विचार करायचा असेल तर गॅस सिलेंडर, डिझेल व पेट्रोल ची झालेली दरवाढ तात्काळ मागे घेवून जनतेला दिलासा देण्याचे काम करावे अशा प्रकारची विनंती करतानाच, महागाई कमी न झाल्यास तसेच डिझेल पेट्रोल आणि गॅस दरवाढ मागे न घेतल्यास आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गर्भीत इशारा राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ बेबीताई उईके यांनी भारत सरकारचे पंतप्रधान यांचे नांवे चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातुन दिलेला आहे. सोबतच सध्या विद्युत मंडळाच्या वतीने नविन इलेक्ट्रॉनिक विद्युत मिटर सक्तीने लावण्यात येत आहे. या मिटरचे ग्राहकांना तिप्पट बिल येत असल्याने महाराष्ट्र शासनाने या मिटरची सक्ती त्वरित थांबवावी अशी मागणी याप्रसंगी करून प्रतिकात्मक इलेक्ट्रॉनिक विद्युत मिटर ची होळी करण्यात आली.
अधिक वृत्त असे की, मोदी सरकारने पुर्ण केलेल्या बारा वर्षांच्या काळात आदिवासी जनतेचे वनवासीकरण करण्याचा अप्रत्यक्षपणे घाट घालण्याचा प्रयत्न केलतो त्वरित बंद यावा.अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके यांनी पुढे असे म्हटले की, आदिवासी हे वनवासी नसुन या देशाचे मुळ मालक आहेत. अनादी काळापासुन आदिवासींचे अस्तित्व असुन ते जल , जंगल, व जमीनीचे मालक आदिवासींना वनवासी संबोधुन त्यांना त्यांच्या हक्कापासून दुर करण्याचे षडयंत्र केल्यास शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडण्यात येईल असेही त्यांनी सरतेशेवटी म्हटले आहे. याप्रसंगी आदिवासी सेल अध्यक्ष जनार्दन गेडाम, अधिवक्ता सेल अध्यक्ष ॲड. पी.बी.वाकुडकर, ओबीसी आघाडी अध्यक्ष प्रा.विठ्ठल मस्करी, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष परब गिरटकर, राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष सुरज चव्हाण, शहर उपाध्यक्ष दीपक कटकोजवार , शहर उपाध्यक्ष आनंद तिराणकर , शहर सचिव अरविंद परचाके, शहर उपाध्यक्षा शोभाताई घरडे, उषा आत्राम, सरस्वती गावंडे, अनुप बेले, मदन उके, सिध्दार्थ मेश्राम, वामन वाटगुरे, परमेश्वर वाघमारे, मोरेश्वर बढोले ,सोनुर्ले, सुनिता मडावी, सचिन पुजारे, आदित्य डेकाटे, आदिंसह असंख्य महिला व युवा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.